Lokmat International News | पाकिस्तान ची पुन्हा पॅक पॅक, म्हणे अनुहल्ला करू | Lokmat News

2021-09-13 14

भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी १२ जानेवारी रोजी म्हटलं होतं की,भारतीय सेना पाकिस्तानी अणुहल्ल्याच्या दिखावेगिरी ला प्रत्युत्तर देण्यास संपूर्णपणे सज्ज आहे. सरकारची परवानगी मिळाली तर आमचे जवान सीमेपार जाऊन कोणतीही मोहीम फत्ते करू शकतात. दोन्ही देश परस्परसंबंध सुधारण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्नशील आहेत. पण, जम्मू-कश्मीरमध्ये सतत होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरी मुळे वातावरण बिघडत आहे.यावर उत्तर देताना ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी ट्वीट केलं. भारताचे लष्करप्रमुख यांचं वक्तव्य अतिशय बेजबाबदार असून त्यांच्या पदाला शोभणारं नाही. हे अणुयुद्धाला आमंत्रण देण्यासारखं आहे. जर त्यांना असं वाटतं की ते आमच्या क्षमतांची परीक्षा करू शकतात तर त्यांचा हा गैरसमज लवकरच दूर होईल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires